मराठी भाषांतरासाठी उपयुक्त असे काही
מפרסם התגובה: Varsha0714 (X)
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
Nov 30, 2009

**This forum has been created for discussing resources with respect to translations in Marathi language only**

नमस्कार!

प्रोझ.कॉमवर मराठी भाषेसाठी स्वतंत्र फोरम नसल्याने मी त्यासंदर्भात (मराठीसाठी स्वतंत्र फोरम तयार करण्याची) विनंती इथल्या संस्थ�
... See more
**This forum has been created for discussing resources with respect to translations in Marathi language only**

नमस्कार!

प्रोझ.कॉमवर मराठी भाषेसाठी स्वतंत्र फोरम नसल्याने मी त्यासंदर्भात (मराठीसाठी स्वतंत्र फोरम तयार करण्याची) विनंती इथल्या संस्थापकांना केली होती. त्यावर मराठीभाषिक सभासदांची संख्या पुरेशी नसल्याने आताच फोरम तयार करता येता येणार नाही असं मला सांगण्यात आलं. त्याऐवजी त्यांनी मला इथे मराठी भाषा/भाषांतरासंबंधी धागे तयार करण्याची मुभा दिली आहे. तरी मी प्रोझस्थित सर्व मराठी भाषांतरकारांना विनंती करते की मराठी भाषांतरासंदर्भात आपण इथे चर्चा सुरु करुया.

मी सध्या चांगल्या आणि मुख्य म्हणजे भाषांतरासाठी उपयुक्त अशा मराठी < > इंग्रजी शब्दकोशांच्या (डीक्शनरीज) शोधात आहे. तसंच मराठी व्याकरण, शुद्धलेखनाचे नियम तसंच मराठी < > इंगजी वाक्प्रचार यासंदर्भात कुठले उपयुक्त पुस्तक तुम्हाला ठाऊक असल्यास इथे त्याची माहिती द्यावी. याखेरीज महाजालावरील उपलब्ध संकेतस्थळांची माहीतीसुद्धा इथे ध्यावी.
धन्यवाद.
Collapse


 
Netra Joshi
Netra Joshi  Identity Verified
קנדה
Local time: 21:55
מאנגלית למארתית
+ ...
Nov 30, 2009

वर्षा,
मराठी भाषांतरकारांसाठी याठिकाणी वेगळा फ़ोरम चालू केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. या फोरम मराठी भाषांतरकारांना नक्कीच उपयुक्त ठरेल अशी माझी खात्री आहे. चांगली डिक्शनरी आणि व्याकरणासंदर्भात कुठलं चांगलं पुस्तक मिळालं तर मी इथे नक्की सांगेन. सध्या माझ्याकडे मो.रा.वाळिंबेंचे ’सुगम मराठी व्याकरण आणि लेखन’ हे पुस्तक आहे. कुणाला त्यामधून काही माहिती हवी असल्यास मला नक्की कळवा.

[Edited at 2009-11-30 18:49 GMT]

[Edited at 2009-11-30 18:50 GMT]


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
मराठीसाठी स्वतंत्र फोरम तयार आहे! Nov 30, 2009

आता मराठीसाठी स्वतंत्र फोरम तयार करण्यात आला आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा!

 
truptee
truptee  Identity Verified
Local time: 10:25
מצרפתית לאנגלית
+ ...
धन्यवाद वर्षा. Dec 1, 2009

कुणीतरी पुढाकार घेणं फारच आवश्यक होतं... आपण घेतल्याबद्दल आपले अनेक आभार.

सारे मराठी लोक, स्वतःपुरताच विचार करताना सर्वत्रच दिसतात. सर्वच बाबतीत.. खंतजनक बाब आहे ही. त्यामुळेच आपली भाषाद�
... See more
कुणीतरी पुढाकार घेणं फारच आवश्यक होतं... आपण घेतल्याबद्दल आपले अनेक आभार.

सारे मराठी लोक, स्वतःपुरताच विचार करताना सर्वत्रच दिसतात. सर्वच बाबतीत.. खंतजनक बाब आहे ही. त्यामुळेच आपली भाषादेखील मागे पडत चालली आहे.

दोन मराठी व्यक्ती एकमेकांना भेटल्यावर एकमेकांशी इंग्लिशमध्येच बोलतात.. याहून वाईट काय?

असो.. आपल्या परीने, आपण सर्वच भाषांतरकार / अनुवादक मराठी थोडी अजून पुढे चालविण्याचा प्रयत्न करतो आहोत हे ही विशेष आहेच की.

मराठीसाठी सर्वसमावेषक असा चांगला शब्दकोश माझ्या पाहण्यात नाही आला अजून पर्यंत.
मी भाषा संचालनालयाचा शासन व्यवहार कोश नेहमीच्या कामांसाठी वापरते.
याशिवाय शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी प्रकाशित केलेले शब्दकोशही उपलब्ध आहेत.
उदा. पदनाम कोश,
विकृतिशास्त्र कोश,
गणितशास्त्र कोश,
वित्तीय शब्दावली,
व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश
विधी शब्दकोश,
वैद्यकीय शब्दकोश
रसायनशास्त्र कोश इ.

हे सर्व त्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या प्रदर्शन-विक्री दरम्यान आपणास पाहता/घेता येऊ शकतात.

मी गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम करते आहे आणि कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास माझ्याशी संपर्क साधता येऊ शकेल. मी माझ्या परीने पूर्ण मदत करेन.

तृप्ती.
Collapse


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
मोल्सवर्थ शब्दकोश सीडी Dec 1, 2009

धन्यवाद नेत्रा आणि तृप्ती.
तृप्ती, ’भाषा संचालनालयाचा शासन व्यवहार कोश’ कसा आहे? हा रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणार्‍या शब्दांचा कोश आहे का? किती शब्दांचा/पानांचा आहे आणि कुठे मिळू शकेल
... See more
धन्यवाद नेत्रा आणि तृप्ती.
तृप्ती, ’भाषा संचालनालयाचा शासन व्यवहार कोश’ कसा आहे? हा रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणार्‍या शब्दांचा कोश आहे का? किती शब्दांचा/पानांचा आहे आणि कुठे मिळू शकेल जरा माहिती देऊ शकशील का?

मी नुकतीच संगणक प्रकाशनाची मोल्सवर्थ मराठी -इंग्रजी शब्दकोश सीडी खरेदी केली आहे. मोल्सवर्थचं मराठी खूप जुन्या पद्धतीचं आहे. पण तरीही एकंदरीत शब्दकोश उपयुक्त वाटतो. आणि सीडी स्वरुपात असल्याने अजून सोयिस्कर पडतो. या सीडीविषयी अधिक माहिती इथे मिळेल: http://molesworth.sanganak.in/moles/
Collapse


 
Anil Karambelkar
Anil Karambelkar  Identity Verified
הודו
Local time: 10:25
חבר (2011)
מאנגלית למארתית
+ ...
Dec 1, 2009

मराठी भाषांतरासाठी जागतिक स्तरावर एक मंच ही काळाची गरज आहे. ती या मंचाद्वारे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण करतानाच या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी आपल्याला काम करताना येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांची सुद्धा देवाण घेवाण केली तर ते सर्वांच्याच हिताचे ठरेल. मराठी भाषा तज्ज्ञांच्या शुद्धलेखनविषयक गोधळामुळे कधी कधी भाषातरकारही अडचणीत येतात, त्या बाबतीतही काही एकवाक्यता निर्माण करता आली तर ते उचित ठरेल आणि सर्वांच्याच हिताचे होईल.

 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
सहमत आहे. Dec 1, 2009

>>>>एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण करतानाच या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी आपल्याला काम करताना येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांची सुद्धा देवाण घेवाण केली तर ते सर्वांच्याच हिताचे ठरेल. मर�... See more
>>>>एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण करतानाच या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी आपल्याला काम करताना येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांची सुद्धा देवाण घेवाण केली तर ते सर्वांच्याच हिताचे ठरेल. मराठी भाषा तज्ज्ञांच्या शुद्धलेखनविषयक गोधळामुळे कधी कधी भाषातरकारही अडचणीत येतात, त्या बाबतीतही काही एकवाक्यता निर्माण करता आली तर ते उचित ठरेल आणि सर्वांच्याच हिताचे होईल.

अतिशय सहमत आहे. याच हेतूने हा फोरम चालू करण्यात आला आहे.
फक्त आपण एक काळजी घेऊया की वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी वेगवेगळे धागे उघडूया म्हणजे माहिती मिक्स होणार नाही. उदा. हा धागा भाषांतरासाठी लागणार्‍या offline/online resourcesविषयी चर्चा करायला वापरूया. बाकी, भाषांतर करताना आलेले अनुभव, शुद्धलेखन, भाषांतर करताना येणार्‍या अडचणी, भारतातील भाषांतर क्षेत्र, मराठी भाषेचे भवितव्य अश्यासारख्या अनेक विषयांवर देवाणघेवाण करणे इथे अपेक्षित आहे. त्यानुसार कुणीही नवीन धागा सुरु करावा. (Post a new topic)
तसंच तुमच्या ओळखीतील भाषातज्ञांनाही या फोरमविषयी सांगा. अजूनही काही सूचना असतील तर त्या जरुर सांगा.
Collapse


 
Mrudula Tambe
Mrudula Tambe  Identity Verified
הודו
Local time: 10:25
מאנגלית למארתית
+ ...
נזכור
अथांग कार्यमग्नतेमुळे Jul 15, 2010

Varsha Pendse-Joshi wrote:

आता मराठीसाठी स्वतंत्र फोरम तयार करण्यात आला आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा!


ह्या मंचावर यायला माँ मृदुलानंदमयींना जरा विलम्बच झाला. असो.

आता त्यांच्या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ सर्वांना मिळेल अशी आशा आहे. बाकी सर्व क्षेम-कुशल ना?


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
स्वागत असो Jul 15, 2010

मॉं मृदुलानंदमयींचे स्वागत असो.
आपल्या समृद्ध अनुभवविश्वातील काही कण आम्हा पामरांच्या कानावर पडल्यास आम्ही ऋणी राहू!


 
rochin
rochin
הודו
Local time: 10:25
מיפנית לאנגלית
+ ...
चाऊस शब्दकोश Aug 16, 2010

चाऊस शब्दकोश पण आहे. मी तोच वापरते!! वर्षा तुला हा शब्दकोश माहित आहे का?? कितपत विश्वासार्ह आहे??

 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
माहीत नाही Aug 17, 2010

rochin wrote:

चाऊस शब्दकोश पण आहे. मी तोच वापरते!! वर्षा तुला हा शब्दकोश माहित आहे का?? कितपत विश्वासार्ह आहे??


नाही मी हा शब्दकोश कधी वापरला नाही त्यामुळे कसा आहे त्याची कल्पना नाही.


 
Anil Karambelkar
Anil Karambelkar  Identity Verified
הודו
Local time: 10:25
חבר (2011)
מאנגלית למארתית
+ ...
मोल्सवर्थची मराठी इंग्लीश सीडी Aug 20, 2013

ही सीडी मीही विकत घेतली होती आणि उपयुक्तही ठरली होती. पण काही काळापासून ती माझ्या पीसीवर सक्रियच होत नाही. त्यांची वेबसाइटही बंद झालेली दिसते, कारण ती उघडतच नाही. आपण काही मार्गदर्शन करू शकता का.

 
Dnyanada Phadke
Dnyanada Phadke
הודו
Local time: 10:25
חבר (2019)
מאנגלית למארתית
+ ...
SITE LOCALIZER
परिभाषा कोश Dec 18, 2015

http://marathibhasha.org/

हा एक चांगला परिभाषा कोश आहे. विशेषतः अभियांत्रिकी, तंत्रज्ञान ह्या विषयातील संज्ञांना चांगले प्रतिशब्द दिलेले आहेत.


 


לא הוקצה מנהל במיוחד לפורום זה.
To report site rules violations or get help, please contact site staff »


मराठी भाषांतरासाठी उपयुक्त असे काही






Trados Studio 2022 Freelance
The leading translation software used by over 270,000 translators.

Designed with your feedback in mind, Trados Studio 2022 delivers an unrivalled, powerful desktop and cloud solution, empowering you to work in the most efficient and cost-effective way.

More info »
Trados Business Manager Lite
Create customer quotes and invoices from within Trados Studio

Trados Business Manager Lite helps to simplify and speed up some of the daily tasks, such as invoicing and reporting, associated with running your freelance translation business.

More info »