इकडच्या तिकडच्या गोष्टी
מפרסם התגובה: Varsha0714 (X)
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
Jul 15, 2010

भाषांतर क्षेत्राशी निगडीत, मराठी भाषेसंबंधित बातम्या, लेख कुणाच्या वाचनात आले तर त्याविषयी तसेच प्रोझ.कॉमसंबंधित बाबींवरही चर्चा करुया.

[Edited at 2010-07-15 13:07 GMT]


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
प्रोझ.कॉम व्हर्च्युअल कॉन्फरन्स २०१० Jul 15, 2010

नुकतीच प्रोझ.कॉम व्हर्च्युअल कॉन्फरन्स २०१०साठी नोंदणी सुरु झाली आहे.
ही कॉन्फरन्स ३ स्वतंत्र दिवशी असणार आहे. (३० सप्टें, १३ ऑक्टो व १० नोव्हें)
आपल्यापैकी कोण कोण उपस्थित राहणार आहे?
मी उपस्थित असेन, कालच नोंदणी केली.

अधिक माहितीसाठी http://www.proz.com/translation3/freelance-translators पहा.


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
अपेक्षेनुसार! Jul 30, 2010

अपेक्षेनुसार कोणीही प्रतिसाद दिला नाही!
चांगलं आहे!!!! कीप इट अप!


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
Sep 13, 2010

लोकसत्ता, लोकरंग (१२ सप्टें २०१०) मधील ’जाणिवा’ सदरामध्ये माझा ’भाषांतरकारांची व्हर्च्युअल कॉन्फरन्स’’ हा लेख छापून आला आहे. ही त्याची लिंक:
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=100010:2010-09-10-14-14-53&catid=252:2009-12-30-13-45-38&Itemid=250


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
गाठभेट Oct 9, 2010

भाषांतरकार मित्र/मैत्रिणींनो,

मी यंदाच्या ऑक्टो-नोव्हेंबरमध्ये भारतात असेन. माझे वास्तव्य मुंबईत असेल.
आपण मुंबईत ठरवून भेटायचं का? प्रोझच्या भाषेत ’powwow' करायचं का?

त्यानिमित्ताने एकमेकांशी प्रत्यक्ष ओळख होईल.
आपलं मत ऐकायला आवडेल.


 
Mrudula Tambe
Mrudula Tambe  Identity Verified
הודו
Local time: 15:16
מאנגלית למארתית
+ ...
נזכור
नक्की भेटेन Oct 16, 2010

Varsha Pendse-Joshi wrote:



मी यंदाच्या ऑक्टो-नोव्हेंबरमध्ये भारतात असेन. माझे वास्तव्य मुंबईत असेल.
आपण मुंबईत ठरवून भेटायचं का?


प्रिय वर्षाताई,

ह्या मंचावर जास्त प्रतिसाद येत नसले तरी केवळ वाङ्मातृ मराठी भाषेच्या प्रेमापोटी आपण ज्या निष्ठेने हा मंच चालविता त्याचे कौतुक वाटते. "की घेतले न हे व्रत अम्ही अंधतेने"... असे हे व्रत असिधारा व्रतच म्हणायला हवे. असो.

आपण भारतात याल तेव्हा मी तर नक्की भेटेनच पण अजून १-२ अनुवादक सोबत येतील असे पण पाहीन (ह्यातला ही र्‍हस्व की दीर्घ?).

कळावें,

लोभ आहेच पण तो दिवसागणिक वृद्धिंगत व्हावा,

आपली व सदैव विनम्र,
मृदुला.


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
दादरमध्ये भेटायचं का? Oct 18, 2010

मृदुलाताई,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. अजून कोणी भाषांतरकार आल्यास अजून उत्तम. (प्रोझवरील बाकी भाषांतरकारांनो, वाचताय ना हे?)

नोव्हेंबरमध्ये भेटण्याची कल्पना कशी वाटते? माझे वास्तव्य दादरमध्ये असेल. तर दादरमध्येच भेटायचं का? तुम्हाला अजून कुठले ठिकाण सुचते आहे का?

सर्व सूचनांचे स्वागत आहे.


 
Mrudula Tambe
Mrudula Tambe  Identity Verified
הודו
Local time: 15:16
מאנגלית למארתית
+ ...
נזכור
हो, Oct 20, 2010

Varsha Pendse-Joshi wrote:

तर दादरमध्येच भेटायचं का?



दादरच उत्तम, आपल्या दोघींनाही सोयीचे आणि इतरांना पण वाहतुकीच्या दृष्टीने मध्यवर्ती.

[जन्मभूमी असल्या कारणाने दादर माझे आवडते पण आहे...

नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी,
नमो पुण्यभूमी जिथे वाढलो मी,
नमो कर्मभूमी जियेच्याच कामी
पडो देह माझा, सदा ती नमी मी... ]


 
Varsha0714 (X)
Varsha0714 (X)  Identity Verified
ארצות הברית
מיפנית לאנגלית
+ ...
TOPIC STARTER
चालेल Oct 23, 2010

चालेल, दादरलाच भेटू. कुठे आणि कधी ते ठरवावे लागेल. मला नोव्हेंबर मध्ये (दिवाळीनंतर) जमेल.
आणि एखाद्या शनिवार-रविवारीच भेटू म्हणजे कामाचा दिवस नसल्याने निवांत बोलता येईल.


 


לא הוקצה מנהל במיוחד לפורום זה.
To report site rules violations or get help, please contact site staff »


इकडच्या तिकडच्या गोष्टी






TM-Town
Manage your TMs and Terms ... and boost your translation business

Are you ready for something fresh in the industry? TM-Town is a unique new site for you -- the freelance translator -- to store, manage and share translation memories (TMs) and glossaries...and potentially meet new clients on the basis of your prior work.

More info »
Pastey
Your smart companion app

Pastey is an innovative desktop application that bridges the gap between human expertise and artificial intelligence. With intuitive keyboard shortcuts, Pastey transforms your source text into AI-powered draft translations.

Find out more »